राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ललिता कुमारमंगलम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी दिल्ली- राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ललिता कुमारमंगलम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ललिता कुमारमंगलम यांची अध्यक्षपदी निवड करताना आपल्याला खूप आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ललिता कुमारमंगलम या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य आणि प्रवक्त्या आहेत. त्यांनी राष्ट्रीय सचिव म्हणूनही पक्षासाठी काम केले आहे.