माथेरानमध्ये दाखल झालेल्या प्रत्येक पर्यटकाची मिनी ट्रेन सफरीची इच्छा असते. मुंबई पुण्याहून येणा-या पर्यटकांची संख्या जास्त आहे.
माथेरान- माथेरानमध्ये दाखल झालेल्या प्रत्येक पर्यटकाची मिनी ट्रेन सफरीची इच्छा असते. मुंबई पुण्याहून येणा-या पर्यटकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे यंदाही सुटीकाळात माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या वाढली आहे. या ट्रेनची बुकींग ऑनलाइन करण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे.
इंजिनातील बिघाडाचेही कारण
इंजिनात वारंवार होणारा बिघाड हेसुद्धा ऑनलाईन बुकींग सुरू न केल्याचे एक कारण आहे. मागील दोन वर्षापासून या मार्गावर एकही नवे इंजिन आलेले नाही. अमन लॉज ते माथेरान या शटल सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद आहे. मात्र, रेल्वेचे पुरेसे लक्ष नसल्याची खंत पर्यटकांनी व्यक्त केली.