Saturday, May 18, 2024
Google search engine
Homeकोलाजमार्खेजचा जादूई वास्तववाद

मार्खेजचा जादूई वास्तववाद

सुनील तांबे याचे ‘मार्खेजची गोष्ट’ हे पुस्तक ‘लोकवाङ्मय गृह’तर्फे लवकरच प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला लेखकाने लिहिलेले मनोगत
booktambeकथात्म साहित्यात अतक्र्य, अद्भुत, तर्कहीन असे घटना, प्रसंग वा घटक वापरून वास्तवाची जाण आणि ज्ञान समृद्ध करण्याची सुरुवात आधुनिक काळात फ्रांझ काफ्काच्या ‘मेटामॉर्फसिस’ या कथेपासून झाली. असं सामान्यत: मानलं जातं. ग्रेगोर साम्झा हा माणूस सकाळी उठतो तेव्हा त्याच्या ध्यानात येतं, की आपलं एका अवाढव्य कीटकात रूपांतर झालं आहे, अशी या कथेची सुरुवात आहे. कीटकामध्ये रूपांतरित झालेल्या ग्रेगोर साम्झाच्या वाटयाला कोणातं आयुष्य येतं. याचा सुरेख आढावा घेऊन, अखेरीस त्याला उचलून घराबाहेर फेकून दिलं जातं या मुद्यावर कथेचा शेवट होतो. उपयुक्तता संपली की कोणत्याही माणसाला कुटुंबात वा समाजात काहीही स्थान नसतं हे सत्य अत्यंत प्रभावी आणि भेदक पद्धतीने काफ्काने मांडलं. हे सत्य मांडण्यासाठी माणसाचं कीटकात रूपांतर होणं हा चमत्कार वापरला. या कथेचं आकलन करून घेण्यासाठी मॅजिकल रिअ‍ॅलिझम वा जादुई वास्तवाद ही संज्ञा साहित्य समीक्षकांनी वापरली, असं मराठी वाचकांना रेलचेल प्राचीन साहित्यात, लोकसाहित्यात वा लोकपरंपरेत भरपूर आहे. कारण हे सर्व साहित्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून निर्माण झालेलं नाही. मानवी जीवन, निसर्ग, विश्व यांच्यातील विविध घटितांचा अर्थ लावण्याच्या, परस्पर संबंध जोडण्याच्या वा शोधण्याच्या गरजेतून या साहित्याची निर्मिती झाली. त्यामुळे या साहित्याला मिथ्यकथा वा पुराणकथा असं म्हटलं जातं. विज्ञान, साहित्य, धर्म, जीवन यांची एकात्मता या साहित्यात आहे. आधुनिक काळात विज्ञान-तंत्रज्ञानामुळे निसर्गाचं आणि विश्वातील घटितांचं आकलन करून घेण्याच्या पद्धती बदलल्या. निसर्गाच्या अतिसूक्ष्म ज्ञानामुळे अधिक प्रगत तंत्रज्ञान रचता येऊ लागलं. अर्थातच त्यामुळे उपभोग्य वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन आणि उपभोग वाढला त्यामुळे मानवी जीवनाबद्दलचं आकलन बदलून गेलं. जीवन अधिकाधिक मानवकेंद्रित बनलं. साहित्यही मानवकेंद्रित बनू लागलं. माणसांच्या प्रश्नांबद्दल अधिकाधिक बोलू लागलं. चमत्कार, अद्भुतरम्यता, अतक्र्य घटना-प्रसंग यांचं आकर्षण कमी झालं नाही, मात्र या घटकांना सामाजिक वा सांस्कृतिक प्रतिष्ठा उरली नाही. अशा काळात ‘मेटामॉर्फसिस’ या कथेने वास्तवाचं भेदक आकलन करून घेण्यासाठी चमत्कार या घटकाचा उपयोग करून घेतला. रातोरात माणसाचं कीटकात रूपांतर होऊ शकत नाही हे वाचक जाणतातच, पण कथेमध्ये वस्तुस्थितीचा स्वीकार करतात. कथात्म साहित्य एक प्रतिसृष्टी निर्माण करतं आणि या प्रतिसृष्टीला वास्तव जगाचे नियम आणि दंडक लागू होत नाहीत, मात्र त्यामुळे स्थळ-काळाने बद्ध असलेल्या वास्तवाचं अधिक सूक्ष्म आकलन होतं, हे या कथेने सिद्ध केलं. काफ्काने प्राचीन कथात्म साहित्यातले चिरकाल टिकणारे घटक, क्लृप्त्या यांचं आधुनिक साहित्यात पुनरुज्जीवन केलं.

‘मेटामॉर्फसिस’ ही कथा गॅबिएल गार्सिया माख्रेजच्या हाती पडली त्याच्या वयाच्या एकविसाव्या वर्षी. ही कथा वाचल्यावर माख्रेज स्वत:शीच म्हणाला, मलाही अशी कथा लिहिता येईल. माख्रेजच्या पहिल्या कथेवरच नव्हे तर बोगोटाच्या वास्तव्यात त्याने लिहिलेल्या जवळपास प्रत्येक कथेवर काफ्काचा प्रभाव आहे. ‘इव्हा इज न हर कॅट’, ‘समवन इज डिसअ‍ॅरेंजिंग रोझेस’ या कथांच्या शीर्षकांवरूनच त्याची कल्पना येऊ शकतेल. माख्रेजच्या या कालखंडातल्या कथा मृत्यू आणि भीती यांच्याभोवती फिरतात. माख्रेजच्या कथा स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या आणि जाणकारांचं त्याच्याकडे लक्ष गेलं. या कथांमुळेच माख्रेजला वर्तमानपत्रात नोकरी मिळाली. मात्र त्यानंतरच्या टप्प्यात माखेजने बोगोटाच्या वास्तव्यातील कथांकडे पाठ फिरवली नसली तरी त्यांच्यापासून अंतर राखणं केलं. त्यानंतरच्या टप्प्यात त्याने लिहिलेल्या कथा व कथात्म साहित्य यामध्ये मॅजिक वा जादू या घटकांचा सढळ वापर असला आणि त्या वास्तवावर भेदक भाष्य करणाय़-या असल्या तरीही तेव्हा माख्रेज हा फार मोठा लेखक समजला जात नव्हता. त्याच्या नावावर लीफ स्टॉर्म नावाची एक कादंबरी होती. मित्रांनीच पदरमोड करून ही कादंबरी केली होती. पण तिचाही फारसा गाजावाजा झाला नव्हता.

१९६७च्या मध्यावर वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिटयूड ही कादंबरी प्रकाशित झाल्यावर माख्रेज बिनीचा लेखक ठरला. ब्युनॉस आयर्समध्ये पंधरा दिवसांत पहिली आवृत्ती संपली. दर आठवडयाला नवी आवृत्ती बाजारात येऊ लागली. स्पॅनिश भाषेतील या कादंबरीचा ३० भाषांमध्ये अनुवाद झाला. तीन कोटींपेक्षा जास्त प्रती आजवर विकल्या गेल्या आहेत. याच कादंबरीने मार्खेजला १९८२ साली नोबेल पारितोषिक मिळवून दिलं. वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिटयूडच्या आधीचं आणि नंतरचं असे मार्खेजच्या व्यावसायिक जीवनाचे दोन भाग झाले. मॅजिकल रिअ‍ॅलिझम ही संज्ञा याच कादंबरीमुळे प्रचारात आली. वास्तववादाचा कोंडलेला प्रवाह या कादंबरीने मोकळा केला. असंही म्हटलं जातं. माखेंजची पहिली कादंबरी लीफ स्टॉर्म १९५५ साली प्रसिद्ध झाली. प्रसिद्धी, मानसन्मान आणि पैसा मिळण्यासाठी माखेंजला एक तप प्रतिक्षा करावी लागली. या कादंबरीच्या यशानंतर मॅजिकल रिअ‍ॅलिझम ही संज्ञा मार्खेजच्या आणि लॅटिन अमेरिकन साहित्याशी कायमची जोडली गेली. लॅटिन अमेरिकन कादंबरीच्या उत्कर्ष काळातले बिनीचे लेखक होते- मारियो व्हर्गास लोयझा, योर्ग लुई बोर्खेस, कोर्तासा, द किंगडम ऑफ द वर्ल्ड (१९५०) या अलेजो कारपेंटीयरच्या (क्यूबा) कादंबरीत दक्षिण अमेरिकी साहित्यातील जादुई वास्तववादाची मुळं आहेत असं मानलं जातं की, कारपेंटीयरचं एक्स्प्लोजन इन कॅथ्रेडल हे पुस्तक वाचल्यावर मार्खेजने वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिटयूडचा पहिला खर्डा बाजूला ठेवला आणि नव्याने लिहायला सुरुवात केली. लॅटनि अमेरिकन लेखकांशी मार्खेजचा परिचय ब-याच उशिराने झाला. त्याच्यावर प्रभाव होता युरोप आणि अमेरिकेतील लेखकांचा. मार्खेजच्या कथात्म साहित्याचा आढावा घेतला तर काफ्का, हेमिंग्वे आणि अखेरीस लॅटिन अमेरिकेतील जादूई वास्तववाद असे ढोबळ टप्पे दिसतात.

मराठी साहित्यात १९६० नंतरच्या लेखक-कवींनी विद्रोहाचा झेंडा फडकवला. (हे लेखक प्रामुख्याने युरोपियन साहित्याने विशेषत: काम्यू, सार्त् यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले होते.) कलावादाचे नकली बुरूज त्यामुळे ढासळून पडले. विविध जनसमूहांच्या आकांक्षांनी लेखन व्यवहारात मुसंडी मारली. विविध जातींच्या लेखकांनी समर्थ आशय साहित्यात आणला. वेगवेगळी आशयसूत्रं आणि भाषेचे नमुने आल्याने मराठी साहित्य समृद्ध झालं. परंतु लेखन हा एक बौद्धिक व्यवहार आहे. लेखकाने एक जीवनविषयक विधान करायचं असतं. हे विधान विज्ञानाप्रमाणे गणिताने सिद्ध होत नसतं तर कल्पनाशक्ती, भाषा, कथावस्तू, पात्रं यांमधून उभं करायचं असतं, याची सुस्पष्ट जाणीव समकालीन मराठी साहित्यात विशेषत: कथा कादंब-यांमध्येही नाही. देशीवादाच्या आक्रमक रूपाने घाटाचा एवढा तिरस्कार केला आहे की, लेखन ही कला असते, ही सामान्य बाबच अनेक लेखक विसरून गेले आहेत. त्यामुळे समाजशास्त्रीय अभ्यास आणि दैनंदिन्या आत्मकथनात्मक वा वास्तववादी कथा-कादंबरी म्हणून मिरवल्या जात आहेत.

अद्भुतता, कल्पनाशक्ती यांची वास्तवाशी सांगड घालण्याचं मार्खेजचं तंत्र उलगडण्यासाठी त्याचं जीवन, त्याच्या परिसराचं सामाजिक-राजकीय वास्तव यांचा शोध घ्यावा लागतो. मार्खेजच्या जादूई वास्तववादाचं तंत्र आणि मंत्र उलगडलं तर मराठी कथात्म साहित्यातील घाट आणि कला यांचं आकलन अधिक समृद्ध होईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट