विदर्भाच्या विकासासाठी आवश्यक असणा-या ‘मिहान’ प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा अडथळा बुधवारी दूर झाला.
नवी दिल्ली – विदर्भाच्या विकासासाठी आवश्यक असणा-या ‘मिहान’ प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा अडथळा बुधवारी दूर झाला. नागपूर विमानतळाच्या विकासासाठी भारतीय हवाई दलाला जागा देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हवाई दलाच्या जागेचे हस्तांतरण आणि परस्पर अदलाबदल करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मिहान प्रकल्पासाठी लागणारी जागा सध्या हवाई दलाच्या ताब्यात आहे.
ही २८८.७४ एकर जागा भारतीय विमानपत प्राधिकरणाकडे हस्तांतरित केली जाईल. त्या बदल्यात हवाई दलाला महाराष्ट्र सरकारतर्फे ४०० हेक्टर जागा दिली जाणार आहे. यामुळे हवाई दलाला त्यांच्या ‘गजराज’ प्रकल्पासाठी मोठी जागा मिळणार आहे.