मुंबईत फिरताना गगनचुंबी इमारतीच्या गर्दीत अंग चोरून उभ्या असलेल्या जुन्या इमारतींवर नेहमीच आपली नजर पडते, पण अनेकदा या इमारतींवरील कळस नीट दिसत नाहीत. मुंबईतील अशाच काही जुन्या इमारतींच्या कळसांची, घुमटांची छायाचित्रं मी ‘फ्रेम टू फ्रेम’साठी घेतली आहेत. ळसाचं छायाचित्रं टिपताना मला लाईट, स्काप या सगळ्याचा विचार करावा लागला. कारण कळसाचे फोटो घ्यायचे तर त्याचं बॅकग्राउंड खूप छान असणं आवश्यक असतं. त्यामुळेच ‘फ्रेम टू फ्रेम’साठी काम करताना मला बराच वेळ लागला. कळसाच्या मागे असलेली आकाशाची पार्श्वभूमी, कळसावर पडणारा प्रकाश यांचा समतोल, कॅमे-याच्या तांत्रिक बाजू सांभाळत चित्रित करावा लागला. त्यानंतरच मुंबईच्या जुन्या ऐतिहासिक खुणा अधोरेखित करणारी चित्रमालिका माझ्या कॅमे-यातून साकारली.