भारतातील सर्वात मोठी डिजिटल बँक पेटीएम पेमेंट्स बँकेने मुंबई डबेवाला असोसिएशनसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीचा भाग म्हणून सुमारे ५००० डबेवाले आता त्यांच्या डबा सेवेबद्दल पेटीएम क्यूआरच्या मदतीने तात्काळ पेमेंट मिळवू शकतील. शिवाय त्यांना पेटीएम पेमेंट्स बँकेत खाते उघडून त्यांना बँकिंग आणि इतर आर्थिक सेवांचा लाभ घेता येईल.
डबेवाले रोख जमा करण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी ‘पेटीएम का एटीएम’ या बँकिंग आऊटलेटमध्ये जाऊन वैयक्तिकृत बँकिंगचा लाभ घेऊ शकतात आणि आपल्या बचत खात्यात ४% आणि धन प्रबंधन खात्यांत ६.८५% पर्यंत कमवू शकतात. ही खास आऊटलेट ग्राहकांना त्यांच्या अगदी जवळ बँकिंगचे केंद्र मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. मुंबईत पसरलेल्या डबेवाल्यांची सेवा पेटीएमच्या प्रणालीत सामील करणे हा अध्र्या अब्ज भारतीयांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या त्यांच्या मिशनशी सुसंगत असा आणखी एक प्रयास आहे.
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रेणु सत्ती म्हणाल्या, ‘मुंबईच्या डबेवाल्यांनी त्यांच्या दोष-रहित जागतिक दर्जाच्या पुरवठा श्रंखला व्यवस्थापनाने जागतिक मान्यता मिळवली आहे. आमच्या पेटीएम क्यूआरच्या मदतीने त्यांच्या मजबूत नेटवर्कसाठी पेमेंट प्रक्रिया सोपी करताना आणि त्यांना बँकिंग सेवा पुरवताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागीदारीमुळे हे डबेवाले २ लाखांपेक्षा अधिक मुंबईकरांकडून, रोख रक्कम सांभाळण्याची जोखीम टाळून, तत्काळ पेमेंट मिळवू शकतील.’ डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष म्हणाले, ‘एक डबेवाला दररोज सरासरी ६०-७० किमी प्रवास करून मुंबईतील हजारो घरांना सेवा देतो. पेटीएमच्या क्यूआर आधारित मोबाईल पेमेंटमुळे आम्हाला आमची निर्दोष डिलिव्हरी आणि सेवेची परंपरा अशीच सुरळीतपणे चालू ठेवण्यास मदत होईल.