आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या मुदगल समितीकडून चौकशी झाली नसल्याचे इंग्लंडचा माजी कसोटीपटू ओवेस शहाने स्पष्ट केले आहे.
लंडन – आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या मुदगल समितीकडून चौकशी झाली नसल्याचे इंग्लंडचा माजी कसोटीपटू ओवेस शहाने स्पष्ट केले आहे.
‘मुदगल समितीच्या अहवालाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत अनवधानाने जाहीर झालेल्या क्रिकेटपटूंमध्ये माझे नाव असल्याचे मला सकाळी कळले. फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणात माझ्यावर आरोप झालेला नाही किंवा मी संशयित नाही. त्यामुळे माझे नाव आल्याने निराश झालो. त्यातच संबंधित समितीकडून माझी कुठलीही चौकशी झालेली नाही. माझ्यावर काय आरोप ठेवण्यात आले आहेत, याचीही मला कल्पना नाही. त्यामुळे मुदगल समितीच्या अहवालात माझे नाव असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती मला कळवण्यात यावी. आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि बेटिंगबाबत मला काहीच माहिती नाही. त्यामुळे त्याबाबत प्रतिक्रिया देणे, योग्य नाही,’’ असे शहाने ब्रिटनमधील प्रसारमाध्यमांना शनिवारी सांगितले.
ओवेस शहाने सहा कसोटी, ७१ वनडे तसेच १७ आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केलेय.