मुदतपूर्वी ठेवी काढताना बँका वेगळा दर आकारू शकतात, मात्र या ठेवी मुदतपूर्व काढण्याच्या सुविधेसह आहेत किंवा नाही यावर ते अवलंबून असेल, अशी सूचना गुरुवारी रिझव्र्ह बँकेने बँकांना जारी केली आहे.
मुंबई- मुदतपूर्वी ठेवी काढताना बँका वेगळा दर आकारू शकतात, मात्र या ठेवी मुदतपूर्व काढण्याच्या सुविधेसह आहेत किंवा नाही यावर ते अवलंबून असेल, अशी सूचना गुरुवारी रिझव्र्ह बँकेने बँकांना जारी केली आहे.
त्याच वेळी १५ लाख किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या सर्व एकल किंवा संयुक्त मुदत ठेवींना मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा देणे सक्तीचे असल्याचे बँकेने स्पष्ट करत १५ लाखांवरील ठेवींना मुदतपूर्व पैसे काढण्याच्या सुविधेतून वगळू शकतात, असे नमूद केले आहे.
फेब्रुवारीत जाहीर झालेल्या सहाव्या द्वैमासिक पतधोरणामध्ये आरबीआयने मुदतपूर्व ठेवी काढण्याच्या सुविधेची घोषणा करताना यासाठी विशेष दर आकारण्याची मुभा बँकांना देऊ केली होती.