आपले यकृत अनेक महत्त्वाची कार्ये पार पाडते. त्याचा आपल्या शरीराच्या मेटाबोलिझमवर परिणाम होतो, बाइल्सच्या निर्मितीत, शरीरातील विषारी द्रव्ये धुऊन काढण्यात, कबरेदके, फॅट्स आणि प्रथिने इत्यादींचे विघटन करण्यात मदत मिळते. हेपटायटिस हा यकृताच्या सुजेचा आजार आहे, तो संसर्गजन्य आहे आणि मातेकडून तिच्या नवजात अर्भकाकडे जाऊ शकतो. हेपटायटिसने ग्रस्त असलेल्या मुलांमध्ये मोठे होत असताना अत्यंत गंभीर गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात. विषाणूच्या स्वरूपानुसार हेपटायटिसमध्ये ए, बी, सी, डी आणि ई असे प्रकार असून ते मुलांमध्ये दिसू शकतात.
हेपेटायटिस ए : ही नवजात बालके आणि मुलांमधील अत्यंत सर्वसामान्य परिस्थिती आहे.
लक्षणे : ताप, मळमळ, उलटय़ा, भूक न लागणे, सातत्याने थकवा, त्वचा आणि डोळे पिवळे होणे.
कारणे : हा आजार दूषित फळे, भाज्या, समुद्री खाद्य आणि इतर अन्न स्त्रोतांमुळे होतो. हात स्वच्छ न धुतलेल्या व्यक्तीने तयार केलेल्या आहाराचे सेवन करणे. दूषित पाण्याचे सेवन करणे.
प्रतिबंध : १२-२३ महिने वयोगटातील मुलांमध्ये लसीकरणाची शिफारस केली असून त्यानंतर दर ६ महिन्यांनी दुसरी लस देण्यात यावी. हेपेटायटिस-ए संसर्गग्रस्त क्षेत्रांत राहणा-या किशोरवयीन आणि तरुण प्रौढ व्यक्तींसाठीही या लसीची शिफारस करण्यात आली आहे.
हेपेटायटिस बी
लक्षणे : हेपेटायटिस बीने ग्रस्त असलेल्या मुलांमध्ये दिसणारी लक्षणे ३ ते ४ महिन्यांनी दिसतात. ती खालीलप्रमाणे आहेत :
सांधेदुखी, पोटदुखी, मळमळ आणि उलटय़ा, कावीळ, पुरळ, गडद रंगाची लघवी होणे, ताप, त्वचा आणि डोळे पिवळे होणे.
कारणे : हेपेटायटिस-बीने ग्रस्त मातेकडून तिच्या नवजात अर्भकाला हेपेटायटिस-बीने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणे किंवा रक्ताशी संपर्क होणे.
प्रतिबंध : अत्यंत कमी वयात लहान मुले आणि नवजात बालके यांचे लसीकरण हा हेपेटायटिस बीचा प्रतिबंध करण्याचा योग्य मार्ग आहे. ०-१-६ महिन्यांच्या कालावधीत तीन डोस देणे आवश्यक असून ५ वर्षात बूस्टर द्यावा लागतो.
हेपेटायटिस सी : लक्षणे : सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना, थकवा, सातत्याने खूप ताप, डोळे आणि त्वचा पिवळी होणे, गडद लघवी.
कारणे : मुलांमध्ये या विषाणूने ग्रस्त मातांमधून हेपेटायटिस सी रूपांतरित होतो आणि गर्भावस्थेदरम्यान मुलांमध्ये रूपांतरित होतो. किडनीने ग्रस्त मुले ज्यांना डायलिसिसची गरज असते. हेमोफिलियासारख्या रक्ताच्या गुठळ्यांनी ग्रस्त मुले.
प्रतिबंध : हेपेटायटिस-सीचा प्रतिबंध संपर्क टाळल्याने, दूषित जेवण, पाण्याचा वापर टाळणे आणि विषाणूने ग्रस्त व्यक्तींशी संपर्क टाळून करता येईल. हेपेटायटिस सीसाठी कोणतीही लस नाही.
हेपेटायटिस डी
लक्षणे : हेपेटायटिस-डीची लक्षणे हेपेटायटिस बीसारखीच आहेत.
कारणे : हेपेटायटिस डी स्वत:हून उद्भवत नाही आणि हेपेटायटिस बीच्या संसर्गासोबत तो येतो.
प्रतिबंध : हेपेटायटिस बीसारखीच
हेपेटायटिस ई
लक्षणे : हेपेटायटिस ईची लक्षणे हेपेटायटिससारख्या इतर संसर्गासारखीच आहेत. यातील काही लक्षणे मळमळ, उलटय़ा आणि सांधेदुखी ही आहेत.
कारणे : हेपेटायटिस ई गर्भावस्थेदरम्यान नवजात बालकांमध्ये परावर्तित होतो. हेपेटायटिस ईच्या संपर्कात येण्यापासून टाळणे हाच सर्वात मोठा प्रतिबंध आहे.
प्रतिबंध : योग्य स्वच्छता आणि निरोगी जीवनशैली यांच्यामुळे हेपटायटिस-ईचा प्रतिबंध होतो. नीट हात धुणे, संसर्गापासून मुक्त स्वच्छ पाण्याच्या पुरवठय़ाची खातरजमा करणे, अन्नाच्या स्त्रोतांवर लक्ष ठेवणे आणि जेवण वाढण्यापूर्वी दर्जा तपासणे या हेपेटायटिस इसोबत संपर्क टाळण्याच्या पद्धती आहेत.