शहरात होणारे वायू प्रदुषण आणि वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने रविवारी ‘कार फ्री डे’ साजरा केला.
नवी दिल्ली- शहरात होणारे वायू प्रदुषण आणि वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने रविवारी ‘कार फ्री डे’ साजरा केला. यावेळी खुद्द दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः सायकलवरून कार्यालयात गेले.
येत्या २२ डिसेंबरला तिसरा आणि २२ जानेवारीला चौथा ‘कार फ्री डे’ संपूर्ण दिल्लीमध्ये साजरा करण्याचा निर्णय केजरीवाल यांनी घेतला आहे. या उपक्रमात सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
रविवारी साजरा करण्यात आलेला हा दुसरा ‘कार फ्री डे’ आहे. यावेळी दिल्लीतील द्वारका मार्गावर हा उपक्रम सकाळी आठ वाजता सुरू करण्यात आला. हा उपक्रम सुरू करण्याआधी केजरीवाल यांनी याविषयी ट्विटरवर माहिती दिली.
केजरीवाल यांच्यासह आप पक्षाच्या अनेक नेत्यांनी सायकलवरून कार्यालायात गेले. ‘येत्या २२ डिसेंबरला साजरा होणा-या ‘कार फ्री डे’मध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा, कारचा वापर न करता सायकलचा वापर करून कार्यालयात यावे. या उपक्रमाला १० टक्के नागरिकांनी प्रतिसाद दिला तरी खूप मोठी गोष्ट असणार आहे’, असे यावेळी केजरीवाल यांनी सांगितले.
याआधी २२ ऑक्टोबरला पहिला ‘कार फ्री डे’ लाल किल्ला येथे साजरा करण्यात आला होता.
8 am, 22 Nov, Sunday. Car free day. Dwarka sports complex, sec 11, Dwarka. Lets cycle together. I will be there. Apni cycle saath lana
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal)
22 Dec-Car free day in East Del.
22 Jan-lets all leave car 4 one day n go office on cycle or public transprt. I'll go 2 my office on cycle
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal)