दुखापतीमुळे अंबाती रायडू झिम्बाब्वे दौ-यातील उर्वरित सामन्यांना मुकणार असून, त्याची जागा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन घेणार आहे.
हरारे – दुखापतीमुळे अंबाती रायडू झिम्बाब्वे दौ-यातील उर्वरित सामन्यांना मुकणार असून, त्याची जागा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन घेणार आहे.
दुस-या वनडेमध्ये खेळताना अंबाती रायडूला दुखापत झाली होती. अंबाती रायडूला तंदुरुस्त व्हायला दोन ते तीन आठवडे लागणार असल्याचे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने स्पष्ट केले.
राष्ट्रीय निवड समितीने दुखापतग्रस्त रायडूच्या जागी उर्वरित दौ-यासाठी संजू सॅमसनची निवड केली आहे. मालिकेतील पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात रायडूने दमदार कामगिरी केली होती.
पहिल्या सामन्यात नाबाद १२४, दुस-या लढतीत ४१ धावा केल्या होत्या. रायडूच्या दुखापतीमुळे केरळच्या संजू सॅमसनसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे उघडले. संजू आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. संजू प्रथमश्रेणीचे २१ सामने खेळला आहे.