भारतातील रिटेलर्सची सर्वोच्च संघटना असलेल्या रिटेल असोसिएशन ऑफ इंडियाने आयटीसी मराठा हॉटेलमध्ये रिटेल सीएफओ परिषद २०१७चे आयोजन केले होते.
मुंबई- भारतातील रिटेलर्सची सर्वोच्च संघटना असलेल्या रिटेल असोसिएशन ऑफ इंडियाने आयटीसी मराठा हॉटेलमध्ये रिटेल सीएफओ परिषद २०१७चे आयोजन केले होते. एक देश एक करप्रणालीच्या काळात रिटेल क्षेत्र, असा विषय असलेल्या या परिषदेला रिटेल कंपन्यांच्या वित्त विभागाचे प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह उद्योगातील इतर मान्यवर उपस्थित होते.
जीएसटी हा गेम चेंजर असून व्यवसायाचे सर्व पैलू त्याने बदलून टाकले आहेत. एक देश एक करप्रणाली रिटेलसाठी कायदा किंवा करपद्धतीमधील बदलापेक्षाही व्यवस्थापनातील बदल अधिक आहे. हाच या सीएफओ परिषद २०१७ चा उद्देश आहे. असे रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन म्हणाले. सीएफओ परिषदेमुळे रिटेल उद्योगातील मुख्य वित्तीय अधिकारी व वित्तीय व्यावसायिकांना नवीन भूमिका समजावून घेण्यासाठी सल्ला व मार्गदर्शन मिळाले.
महत्त्वाच्या चर्चासत्रांमध्ये पुढील विषयांचा समावेश होता. कॅशलेसमध्ये आघाडी- भारतातील डिजिटल वॉलेट उद्योगात होणारी क्रांती, सायबर धोक्यापासून ग्राहकांची माहिती व खासगीपणाची सुरक्षा रिटेल उद्योगासाठी दुहेरी आव्हान, जीएसटी अंमलबजावणीनंतरचे फायदे व तोटे