दूरसंपर्क क्षेत्रात रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या प्रवेशाने डेटा सेवेतील स्पर्धा अधिक तीव्र होईल.
नवी दिल्ली– दूरसंपर्क क्षेत्रात रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या प्रवेशाने डेटा सेवेतील स्पर्धा अधिक तीव्र होईल. ज्यामुळे इंटरनेट डेटा दर २० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता असल्याचे आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था फिचने म्हटले आहे. मात्र २००९-१३ या कालावधीत जे दरयुद्ध दिसले तशी स्थिती नसेल असेही या संस्थेने स्पष्ट केले आहे.
पुढच्या वर्षी पहिल्या सहामाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा भाग असलेली ही कंपनी बाजारात उतरणार आहे. यामुळे स्पर्धा वाढून कमीत कमी २० टक्क्यांनी डेटा स्वस्त होईल, असे आपल्या अहवालात म्हटले आहे. रिलायन्स जिओने २०१५मध्ये फोरजी दूरसंपर्क सेवा सुरू करण्याची घोषणा केली असून यासाठी ७०,००० कोटी गुंतवणार आहे. ही कंपनी डेटा सेवेवर अधिक भर देणार असल्याने त्याचा व्हाइस सेवेवर फारसा परिणाम होणार नाही.