आयपीएलचे माजी वादग्रस्त अध्यक्ष ललित मोदी यांची राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या (आरसीए) अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
जयपूर- आयपीएलचे माजी वादग्रस्त अध्यक्ष ललित मोदी यांची राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या (आरसीए) अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. मोदींना अध्यक्षपदावरून हटवताना त्यांच्या प्रतिस्पर्धी गटाचे प्रमुख अमिन पठाण यांनी असोसिएशनची सूत्रे आपल्याकडे घेतली आहेत. पठाण यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. मोदींना हटवण्यासाठी ३३पैकी २३ जिल्हा संघटनांनी पाठिंबा दर्शवल्याचे समजते.
आयपीएलमध्ये पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी बीसीसीआयने ललित मोदी यांच्यावर आजीवन बंदी घातली. मात्र त्यांनी मे महिन्यात राजस्थान क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवली. मोदींचा गट निवडून आल्याने ते अध्यक्ष बनले. दरम्यान, बीसीसीआयने या असोसिएशनवर बंदी घातल्याने क्रिकेटपटूंचे मोठे नुकसान झाले होते.