एका नेटवर्कवरुन दुस-या नेटवर्कवर कॉल केल्यास सेवा प्रदात्याला (सर्व्हीस प्रोवायडर) द्यावा लागणारा इंटरकनेक्शन युसेज चार्जचा दर कमी करण्याची घोषणा दूरसंचार नियामक आयोग ट्रायने केली आहे.
नवी दिल्ली – एका नेटवर्कवरुन दुस-या नेटवर्कवर कॉल केल्यास सेवा प्रदात्याला (सर्व्हीस प्रोवायडर) द्यावा लागणारा इंटरकनेक्शन युसेज चार्जचा दर कमी करण्याची घोषणा दूरसंचार नियामक आयोग ट्रायने केली आहे.
त्यामुळे लँण्डलाईन आणि मोबाईलचे कॉल दर कमी होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फायदा फिक्स लाईन फोन्स म्हणजे लँण्डलाईन धारकांना होऊ शकतो. त्यांना महिन्याला काही मोफत कॉल तसेच मिनिटे मिळू शकतात.
लॅंण्डलाईन फोनवरी इंटरकनेक्शन युसेज चार्ज पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. यापूर्वी प्रतिमिनट वीस पैसे असा हा दर होता. मोबाईल फोनचे आययूसी दर तीस टक्क्यांनी कमी केले आहेत. मोबाईलचे आययूसी दर प्रतिमिनिट वीस पैशांवरुन १४ पैसे करण्यात आला आहे.
मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे लँण्डलाईन फोनची संख्या झपाटयाने कमी होत आहे. लँण्डलाईन फोन्सला चालना देण्यासाठी ट्रायने हा निर्णय घेतला आहे. मोठया सर्व्हीस प्रोवायडर कंपन्या याचा थेट लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवायला साशंक असल्या तरी, छोटे सर्व्हीस प्रोवायडर याचा थेट लाभ मोबाईल ग्राहकांपर्यंत पोहोचवायला उत्सुक्त आहेत.