क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉडर्सवर पुढ्च्यावर्षी २०१६ मध्ये नेपाळ आणि मेरीलबोन क्रिकेट क्लबमध्ये क्रिकेटचा मैत्रीपूर्ण सामना होणार आहे.
लंडन – क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉडर्सवर पुढ्च्यावर्षी २०१६ मध्ये नेपाळ आणि मेरीलबोन क्रिकेट क्लबमध्ये क्रिकेटचा मैत्रीपूर्ण सामना होणार आहे. तसेच यावर्षी नोव्हेंबर महिन्यात मेरीलबोन क्रिकेट क्लबचा संघ नेपाळचा दौरा करणार आहे.
१२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान एमसीसीचा संघ नेपाळ दौ-यावर येणार आहे. मे महिन्यात नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे या दौ-याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली होती.
मात्र एमसीसीचे प्रमुख जॉन स्टेपहेनसन यांनी एमसीसीचा संघ नेपाळ दौ-यावर जाणार असल्याचे स्पष्ट केले. पुढच्यावर्षी जुलै महिन्यात नेपाळचा क्रिकेट संघ पहिल्यांदाच लॉडर्सच्या मैदानावर खेळणार आहे. नेपाळ-यूके संबंधाची २०० वर्ष साजरी करण्यात येत आहे. हा सामना त्याचाच एक भाग आहे.