आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील ४०पैकी अकरा जागा काँग्रेस आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याची तयारी राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.
पाटणा- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील ४०पैकी अकरा जागा काँग्रेस आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याची तयारी राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.
रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)त प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमी यादव यांनी ही घोषणा केली आहे. लोकसभेच्या राज्यातील जागावाटपासंदर्भात बिहार काँग्रेसचे प्रमुख सी.पी.जोशी यांनी ही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
धार्मिक शक्तींना रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र आले पाहिजे यासाठी आरजेडी काँग्रेस सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भातील अंतिम निर्णय रविवारी होणा-या पक्षाच्या संसदीय सदस्यांच्या बैठकीत होणार असल्याचे ते म्हणाले.
गेल्या लोकसभा निवडणुकीतील पक्षांच्या कामगिरीवरच जागावाटप केले जाईल असे लालू यांनी स्पष्ट केले.