अमली पदार्थ तस्करीप्रकरणी भारताचा अव्वल बॉक्सर विजेंदर कुमारची डोपिंग चाचणी होण्याची शक्यता नसल्याचे ‘नाडा’ने रविवारी स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली– अमली पदार्थ तस्करीप्रकरणी भारताचा अव्वल बॉक्सर विजेंदर कुमारची डोपिंग चाचणी होण्याची शक्यता नसल्याचे ‘नाडा’ने रविवारी स्पष्ट केले आहे. विजेंदरचा मित्र राम सिंगने काही प्रमाणात अमली पदार्थाचे सेवन केल्याची कबुली दिली आहे.
राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थाच्या अधिका-यांनी विजेंदरची चाचणी होण्याची शक्यता फेटाळली आहे दरम्यान या प्रकरणा तपास पोलिस करत असल्याने यात एनएडीएची अद्याप कोणतीच भूमिका नसल्याचे अधिका-यांनी सांगितले.
फतेहगड साहिब जिल्ह्यातील अनुप सिंग कोहलॉनच्या घरातून पोलिसांनी २६ किलो अमली पदार्थ जप्त केले होते. त्यानंतर चौकशीत अनुपने राम सिंगचे नाव घेतले होते.
दरम्यान, अमली पदार्थाचे सेवन केल्याची कबुली दिल्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टसने राम सिंगची हकालपट्टी केली आहे. विशेष म्हणजे विजेंदरच्या शिफारशीनंतर राम सिंगची एनआयएसममध्ये निवड करण्यात आली होती.
जागतिक उत्तेजक द्रव सेवन विरोधी संस्थेच्या(वाडा) नियमानुसार वैद्यकीय चाचणीत अमली पदार्थांचे सेवन केल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत खेळाडूवर कारवाई करता येत नसल्याचे नाडाच्या अधिका-यांनी सांगितले.
[EPSB]
राम सिंगची एनआयएसमधून हकालपट्टी »
अमली पदार्थ तस्करीप्रकरणी बॉक्सर राम सिंगला राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…
[/EPSB]