ड्युएल रिअर कॅमेरा असलेला हा कंपनीचा भारतातील पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे.
मुंबई- स्मार्टफोनच्या क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवरील सर्वोत्तम ब्रॅण्ड्समध्ये गणल्या जाणा-या व्हिवोने आपल्या Vivo V9 या नव्या स्मार्टफोनच्या बाजारातील आगमनाची घोषणा केली आहे. ड्युएल रिअर कॅमेरा असलेला हा कंपनीचा भारतातील पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे.
या नव्या स्मार्टफोनमध्ये १६ एमपी + ५ एमपी क्षमतेच्या दुहेरी रिअर कॅमे-याबरोबरच १९:९ FullView™ display २.० आणि या क्षेत्रातील सर्वाधिक म्हणजे ९० टक्के स्क्रीन-टू-बॉडी प्रमाण अशी काही जुन्या वहिवाटिंना आव्हान देणारी वैशिष्ट्येही आहेत.
आजच्या तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून या फोनची रचना करण्यात आल्याने यात अभिजात बाह्यरूप आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये यांचा मिलाफ घडवून आणलेला आहे.
रु.२२,९९० किंमतीच्या या स्मार्टफोनमध्ये शँपेन गोल्ड आणि पर्ल ब्लॅक अशा दोन रंगांचे पर्याय असून २ एप्रिलपासून तो सर्व ऑफलाइन दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्याआधी सर्व किरकोळ विक्री दुकानांत, व्हिवो ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि पेटीएम मॉलवर या फोनसाठी प्री-बुकिंगही करता येणार आहे.
२३ मार्च ते २ एप्रिलपर्यंत या फोनचे प्री-बुकिंग करणारे ग्राहक या फोनच्या डिस्प्लेची अपघाताने मोडतोड झाल्यास एकदा स्क्रीन बदलून मिळण्यास पात्र ठरणार आहेत. याखेरीज जुन्या फोनच्या बदल्यात हा फोन विकत घेणा-या ग्राहकांना २००० रुपयांची सूटही मिळणार आहे. हा फोन ईएमआयवर खरेदी करणा-यांसाठी सहयोगी ई-कॉमर्स मंचांकडून १२ महिन्यांपर्यंत बिनव्याजी ईएमआयची सोयही दिली जाणार आहे.
Vivo V9 ची वैशिष्ट्ये
>> ड्युएल रिअर कॅमेरा (१६ एमपी + ५ एमपी)
>> २४ एमपी क्षमतेचा AI सेल्फी कॅमेरा
>> १९:९ FullViewTM display २.०
>> क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६२६ ऑक्टा कोअर
>> ४ जीबी रॅम/६४ जीबी रोम
>> ३२६० एमएएच बॅटरी
>> Face Access २.० आणि गेम मोड