कोकण रेल्वेच्या मार्गावर डबल डेकर रेल्वे गाडी सोडण्याचा प्रस्ताव रेल्वेने ब-याच महिन्यांपासून समोर ठेवला होता. मुंबई ते गोवा हा मार्ग रेल्वेने ठरवला होता पण या डबल डेकरच्या पहिल्याच दिवशी एका चालकाच्या हटवादीपणामुळे ही गाडी रोहा स्थानकात एक तास थांबून राहिली. कोकण रेल्वे रोहय़ातून सुरू होते. त्यामुळे ही गाडी मध्य रेल्वेने रोह्यापर्यंत न्यावी आणि तिचा पुढचा प्रवास कोकण रेल्वेच्या चालकाने करावा, ही गोष्ट अगदी साहजिक आणि नियमाला, संकेतांना धरून होती. पण कोकण रेल्वेने आपला चालक रोहय़ाला पाठवला नाही. ही गाडी मध्य रेल्वेच्याच चालकाने पुढे रत्नागिरीपर्यंत आणावी, अशी कोकण रेल्वेचे म्हणणे होते. या संबंधात रेल्वेच्या या दोन विभागांत काय करार झाला होता, हे माहीत नाही पण तो निदान उभय पक्षांच्या अधिका-यांना तरी माहीत असायला हवा होता. याबाबत दोन विभागाचे अधिकारी जे काही सांगत आहेत ते परस्पर विरोधी आहे. पण यात कोकण रेल्वेने रोहय़ापासून गाडी पुढे न्यायला हवी होती, ही गोष्ट सत्य आहे. करार, संकेत आणि अधिका-यांचे आकलन काहीही असले तरीही रेल्वे रोहय़ाला एक तास उभी राहिल्याने रेल्वेची शोभा होते, याचे भान कोणालाच नव्हते. लोकमान्य टर्मिनसवरून ही गाडी सुरू झाली होती आणि ठाण्याला तिचे मोठे स्वागत झाले होते. पण रोहय़ात अशी फजिती झाली. रोहय़ापर्यंत आलेल्या मध्य रेल्वेच्या चालकाने गाडी पुढे नेण्यास नकार दिला कारण त्याच्याकडे त्याच्या साहेबांचा तसा आदेश नव्हता. त्यामुळे तो सुटला. पण वेळीच दक्षता न घेतल्याने अधिकारी अडकले. याबाबत कोकण रेल्वेच्या अधिका-यांचे म्हणणे वेगळे आहे. ही गाडी मध्य रेल्वेच्या चालकाने रत्नागिरीपर्यंत न्यावी, असाच करार होता असे त्यांचे म्हणणे आहे. एकंदरित या दोन विभागातला समन्वयाचा अभाव आणि संवादातली दरी समोर आली. डबल डेकर डबा नेहमीच वादात सापडलेला आहे. त्याची चाचणी घेतानाही असाच वाद झाला होता. रेल्वेला मात्र डबल डेकर गाडी ही एक पर्वणी वाटत आहे. कारण या गाडीच्या डब्यात एका वेळी १२० प्रवासी बसू शकतात. याचा अर्थ आहे प्रत्येक डब्यात दोन बस गाडय़ा. ही गाडी एकाच वेळी २५ ते ३० बसगाडय़ा एवढे प्रवासी नेऊ शकते. असाच हिशेब करून ही गाडी गणेशचतुर्थीच्या गर्दीच्या वेळी सुरू करण्यात आली. पण तिला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. रेल्वेने प्रवासी वाहतुकीची अनेक गणिते केली असली तरी ही गाडी वातानुकूलित आहे. त्यामुळे तिचा तिकिटाचा दर सामान्य डब्यापेक्षा किती तरी पटीने जादा आहे. डबल डेकर रेल्वे सुरू करायला काही हरकत नाही. तिचे स्वागतच आहे पण ती सुरू करताना वातानुकूलित असावी, हा अट्टाहास करायला नको होता. लोकांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेली ही गाडी सामान्य माणसाला न परवडणारी ठरली आहे.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on