श्रीलंकेच्या रंगना हेरथच्या भेदक मा-यासमोर पहिला डाव २५१ धावांवर संपुष्टात आल्याने पाहुण्या वेस्ट इंडिजवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली.
गॉल – श्रीलंकेच्या रंगना हेरथच्या भेदक मा-यासमोर पहिला डाव २५१ धावांवर संपुष्टात आल्याने पाहुण्या वेस्ट इंडिजवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली.
ड्वायेन ब्राव्हो वगळता विंडिजचे इतर फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. श्रीलंकेने पहिल्या डावात ४८४ धावा केल्या. तिसरा दिवसअखेर शुक्रवारी विंडिजने दुस-या डावात दोन बाद ६७ धावा केल्यात. अद्यापही ते १६६ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे आठ गडी शिल्लक आहेत.
दुस-या दिवशी दोन बाद ६६ वरुन खेळण्यास सुरुवात केल्यानंतर तिस-या दिवशी वेस्ट इंडिजला पहिल्या डावात ८२ षटकांत २५१ धावा करता आल्या.
श्रीलंकेच्या रंगना हेरथने सर्वाधिक सहा बळी घेत वेस्ट इंडिजचा चांगलाच पाहुणचार घेतला. त्याने ३३ षटके गोलंदाजी करताना ६८ धावांत सहा गडी बाद केले. धम्मिका प्रसादने दोन बळी मिळवले.