ही खेळणी आणि लव्ह कुशन्स तयार करण्यात आली आहेत, खास हृदयाच्या आकारात आणि त्यातून व्यक्त होते खास व्यक्तीसाठी असलेले प्रेम आणि जिव्हाळा. यातील प्रत्येक रेंजवर एकतर ‘Love’ ही अक्षरे ठळकपणे लिहिलेली आहेत किंवा एकत्र जोडप्याचे चित्र आहे. यातून यंदाचा मोसम अगदी ठळकपणे दिसतो. त्यांच्या जिवंत भासणा-या, प्रेमळ डोळ्यांमुळे हे मऊशार आणि गुबगुबीत टेडी बीअर्स फारच छान दिसतात आणि अगदी त्यांना मिठीच मारावीशी वाटते. हे टेडी बीअर्स तुमच्या प्रियजनांचे खास जोडीदार बनू शकतात. या टेडी बीअर्सच्या माध्यमातून तुम्ही खास वैयक्तिक संदेशही देऊ शकता. प्रियजनांसाठी दिलेला खास संदेश कंपनीतर्फे या टेडी बीअरवर खास पद्धतीने मांडला जाईल.
हृदयाच्या आकारातील लव्ह कुशन्स १३ ते १५ इंच या आकारात उपलब्ध आहेत आणि या कुशन्स दोन प्रकारांत उपलब्ध आहेत. या कुशन्स तुमच्या प्रियजनांच्या गाडीत, बेडरूममध्ये किंवा दिवाणखान्यात शोभेची वस्तू म्हणून वापरता येतील. या खेळण्यांमध्ये आणि कुशन्समध्ये वापरण्यात आलेले सर्व साहित्य प्रीमिअम दर्जाचे आहे आणि त्यात उच्च सुरक्षा दर्जा जपण्यात आला आहे. ही सर्व उत्पादने मऊशार, धुता येण्याजोगे, त्वचेला हानी न पोहोचवणारी आणि नॉन-टॉक्सिक आहेत.
खास व्हॅलेंटाईन रेंजसोबतच तुम्ही आगळ्या रीतीने डिझाईन केलेले आणि आकर्षक पेन स्टँड्स, पाऊचेस, शोल्डर स्लिंग्स आणि पेंग्विन, कांगारू, डॉल्फिन आणि अन्य प्राण्यांच्या आकारातील प्लश टॉईजही देऊ शकता. तुम्ही देणा-या या भेटी अधिक सुंदर आणि आकर्षक दिसाव्यात यासाठी अल्ट्रातर्फे अतिशय सुंदर डिझाईन केलेले ३डी गिफ्ट एन्व्हलप्सही उपलब्ध आहेत.
>> क्युट आणि गुबगुबीत टेडी बीअर्सचे सहा वेगवेगळे प्रकार आणि हृदयाच्या आकाराच्या कुशन्स तुमच्या प्रियजनांना भेट देण्यासाठी सज्ज आहेत.
>> या श्रेणीचे एक खास वैशिष्टय़ म्हणजे यातील खास तयार करण्यात आलेल्या टेडी बीअर्सच्या माध्यमातून तुम्ही वैयक्तिक संदेशही देऊ शकता. कंपनी हा संदेश खास कलात्मकरीत्या त्यावर मांडेल.
>> ३ ते ७ फुट उंचीचे हवेहवेसे वाटणारे आणि क्युट ‘टेडी बीअर्स’ वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहेत. या क्युटशा टेडीला तुम्ही स्वत: कुशीत घेऊ शकता किंवा तुमच्या खास आवडीच्या व्यक्तीला भेट देऊ शकता.
>> फक्त खास www.ultragiftbox.com <http://www.ultragiftbox.com> इथे या रेंजवर २० ते ४० टक्के खास सवलतही आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, पेटीएम, शॉपक्ल्यूज इत्यादी ई-स्थळांवर आणि भारतातील सर्व आघाडीच्या स्टोअर्समध्ये ही उत्पादने उपलब्ध आहेत.