सर्वसामान्यांचा पक्ष असल्याचा संदेश देणारे ‘आप’ पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सर्व सहकारी शनिवारी शपथ घेण्यासाठी रामलिला मैदानाकडे मेट्रोने जाणार आहेत.
गाझियाबाद – सर्वसामान्यांचा पक्ष असल्याचा संदेश देणारे ‘आप’ पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सर्व सहकारी शनिवारी शपथ घेण्यासाठी रामलिला मैदानाकडे मेट्रोने जाणार आहेत.
कौशंबी येथील आपल्या निवासस्थानी ‘जनता दरबार’ आटोपल्यानंतर केजरीवाल यांनी स्पष्ट केले.संपूर्ण व्यवस्था ही कोलमडली असून, ती दुरुस्त करणे आवश्यक आहे. त्यामुळेच लोक मुख्यमंत्र्यांकडे आपल्या तक्रारी घेऊन येत आहेत.
समस्या दूर करण्याबाबत लोकांच्या सरकारकडून भरपूर अपेक्षा आहे. त्यामुळे आपल्या सर्वाना एकत्र काम करण्याची गरज असून, आम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे.