मोहम्मद शामी आणि उमेश यादव या सहका-यांची प्रभावी कामगिरी पाहून आत्मविश्वास उंचावल्याचे भारताचा मध्यमगती गोलंदाज मोहित शर्माने सांगितले.
हॅमिल्टन- मोहम्मद शामी आणि उमेश यादव या सहका-यांची प्रभावी कामगिरी पाहून आत्मविश्वास उंचावल्याचे भारताचा मध्यमगती गोलंदाज मोहित शर्माने सांगितले.
‘‘शामी आणि उमेश यादवच्या प्रभावी गोलंदाजीमुळे आपलीही कामगिरी उंचावली जाऊ शकते, असा विश्वास निर्माण झाला. त्यांच्यासोबत अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या अचूक आणि प्रभावी गोलंदाजीमुळे मला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली.
प्रतिस्पर्धी फलंदाजांना आतापर्यंत दडपणात ठेवण्यात यश आले आहे. माझा बाउन्सर चेंडू ज्या वेगाने पडत आहे ते मी सरावावर घेतलेल्या मेहनतीमुळे शक्य झाले आहे. कारण माझा बाउन्सर फलंदाजांना खेळावाच लागतो त्यामुळे फलंदाज झेल देऊन बाद होण्याची शक्यता अधिक असते.
मात्र त्याचवेळी माझ्या बाउन्सर चेंडूंवर चौकार आणि षटकार फटकवला जाण्याचीही शक्यता असते. त्यातच आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये पाहिले तर भारताच्या गोलंदाजांना दडपणात गोलंदाजी करावी लागली नाही.
त्यातच आता न्यूझीलंडमध्ये ऑस्ट्रेलियापेक्षा तुलनेने लहान मैदानांवर खेळायचे आहे. ते पाहता गोलंदाजीच्या दिशेतही थोडा बदल अपेक्षित आहे. त्यादृष्टीने आम्ही सराव करत आहोत,’’ असे मोहितने म्हटले. दुखापतग्रस्त इशांत शर्माच्या जागी संधी मिळालेल्या मोहितने चार सामन्यांतून सहा विकेट घेतल्यात.