भारताचा युवा जलदगती गोलंदाज मोहम्मद शामी विश्वचषकातील यूएईविरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे.
मेलबर्न – भारताचा युवा जलदगती गोलंदाज मोहम्मद शामी विश्वचषकातील यूएईविरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे शनिवारी होणा-या सामन्यात तो खेळणार नसल्याचे आयोजकांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
मोहम्मद शामीचा डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे दीर्घकालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने तो यूएईविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. आयसीसी विश्वचषकाच्या वेबसाईटवरुन माहिती देण्यात आली.
विश्वचषकातील आतापर्यंतच्या दोन सामन्यात शामीने चांगली कामगिरी केली आहे. त्याने पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आतापर्यंत सहा गडी बाद केले आहेत.