भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शिक्षकदिनाच्या निमित्ताने आपले प्रशिक्षक, गुरु रमाकांत आचरेकर सरांना वंदन केले आहे.
मुंबई – क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे तर, अन्य क्षेत्रातही अनेकांचा आदर्श असणारा भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शिक्षकदिनाच्या निमित्ताने आपले प्रशिक्षक, गुरु रमाकांत आचरेकर सरांना वंदन केले आहे.
सचिनने त्याच्या टि्वटर अकाऊंटवर एका सुंदर संदेशासह रमाकांत आचरेकर सरांबरोबरचा त्याचा एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये आचरेकर सर छोटया सचिनला फलंदाजीचे तंत्र शिकवताना दिसत आहेत.
या फोटोमध्ये गुरुचे वर्णन करणारा सुंदर संदेश लिहीला आहे. ‘शिक्षकापासून स्वप्नांची सुरुवात होते. जो तुमच्यावर विश्वास ठेवतो. तुमच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतो. तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातो आणि काहीवेळा सत्य नावाच्या काठिने तुम्हाला दाटवतोही’.