मोडी लिपी महाराष्ट्रात गेली ९०० वर्ष प्रचलित आहे.
असं असूनही या भाषेला प्रसिद्धी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून प्राप्त झाली. संबंध मराठी इतिहास हा मोडी लिपीत लिहिला गेला आहे. त्यातील फक्त १० टक्के महाराजांचा इतिहास हा उजेडात आला आहे. महाराजांच्या संपूर्ण इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर मोडी लिपी वाचकांची गरज आहे. जास्तीत जास्ती लोकांना मोडी लिपी अवगत होण्यासाठी ‘जागतिक मोडी लिपी प्रचार समिती’ विविध कार्यशाळा घेते. नवनवे उत्कृष्ट मोडी लिपी वाचक तयार करून शिवाजी महाराजांचा अप्रकाशित इतिहास उजेडात यावा, यासाठी संस्थेने मोडी लिपी प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेतला आहे. मोडी लिपीचे अभ्यासक राजेश खिलारी यांचं मार्गदर्शन या प्रशिक्षण वर्गास लाभेल. २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान होणा-या या प्रशिक्षण वर्गाचं प्रवेश शुल्क ५०० रुपये आहे. विद्यार्थ्यांना वर्गसमाप्ती नंतर प्रमाणपत्र देण्यात येईल.
वेळ : सकाळी १०.०० ते १२.००
पत्ता : माध्यमिक शाळा, कन्नमवार नगर क्रमांक १, विक्रोळी पूर्व, मुंबई-४०००८३