बाटामालू परिसरात बुधवारी दुपारी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गाडीवर ग्रेनेड हल्ला केला.
श्रीनगर – बाटामालू परिसरात बुधवारी दुपारी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गाडीवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात चार पोलिस कर्मचा-यांसह एका कैदी जखमी झाला आहे.
दुपारच्या सुमारास वर्दळीच्या बाटामालू बस स्टॅंण्डजवळून पोलिसांची गाडी जात असताना दहशतवाद्यांनी हा ग्रेनेड हल्ला केला. ग्रेनेडचा थेट गाडीत स्फोट झाला. ज्यात चार पोलिसांसह शकील अहमद खताना हा कैदी जखमी झाला. स्थानिक नागरिक गुलाम नबी हे सुध्दा या स्फोटात जखमी झाले.
खताना या स्फोटात गंभीर जखमी झाला आहे. त्याला पठाणकोट पोलिस चौकीतून बारामुल्ला जिल्हा तुरुंगात हलवण्यात येत होते. गेल्यावर्षी त्याला शस्त्रास्त्र कायद्याखाली अटक करण्यात आली होती. मुस्लिमांचा पवित्र रमझान महिना सुरु झाल्यानंतर श्रीनगरमध्ये झालेला हा पहिला दहशतवादी हल्ला आहे.