भारतात मोठय़ा प्रमाणात जैवविविधता पाहायला मिळते. ही जैवविविधता जंगले, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यामुळे टिकून राहिलेली आहे. मात्र, आता भाजपा सरकारने त्यावर अधिकृतपणे अतिक्रमण करण्याचे ठरवले आहे. राज्यातील संरक्षित राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यासाठी राखून ठेवलेला १० किलोमीटरचा बफर झोन कमी करण्याचा घाट भाजपा सरकार घालत आहे. केंद्राकडून याला तत्त्वत: मान्यता मिळालेली असल्यामुळे येत्या काळात अशा उद्याने आणि अभयारण्याच्या अगदी जवळ म्हणजे दोन किलोमीटरच्या परिसरात हॉटेल्स, रिसॉर्ट आणि वसाहती उभ्या राहतील. त्यामुळे सिमेंटची जंगले उभी राहतील आणि खरीखुरी जंगले नष्ट होत जातील. जंगले घटल्यामुळे त्यातील जैवविविधता घटेल. याचा फायदा बिल्डरांना होणार असून त्यामुळे राज्यातील ६ राष्ट्रीय उद्याने आणि ४७ अभयारण्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे जर जंगलांचा घास घेऊनच सिमेंटची जंगले तयार होत आहेत. पण त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार कशावरून? कारण देशात आणि राज्यात भाजपा सत्तेवर आल्यावर भाजपाने अत्यंत पद्धतशीरपणे सर्वसामान्यांना डावलून उद्योगपती आणि कंत्राटदारांचे भले करण्याकडे कल दिसतो. त्या दृष्टीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. अलीकडेच म्हाडाला हाऊसिंग स्टॉक न देण्याचा निर्णय गृहनिर्माणमंत्र्यांनी घेतला असून त्या ऐवजी प्रीमियम देण्याचा विचार केला जात आहे. सर्वसामान्य संपूर्णपणे म्हाडाच्या परवडणा-या घरांवर अवलंबून असतात. अशा वेळी म्हाडा आणि एसआरएमार्फतही लोकांना थेट घरे मिळू नयेत, यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे आणि आता तर संरक्षित अशा राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतात लोकसंख्या वाढत आहे. मात्र, लोकसंख्या वाढली तरी त्या त्या राज्यांमध्ये त्यांच्या अन्न, वस्त्र, निवा-याचा प्रश्न सुटत नाही. म्हणूनच असे लोक मुंबईसारख्या मोठय़ा महानगरांमध्ये स्थलांतर करतात. शहरात हे लोक झोपडपट्टी किंवा दाटीवाटीने राहतात. त्यांच्यासाठी तसेच सर्वसामान्यांसाठी घरांची आवश्यकता भासते. ही गरज म्हाडा किंवा ‘एसआरए’च्या योजनेतून काही अंशी पूर्ण केली जाते. सर्वसामान्यांना डावलून उद्योजक आणि बिल्डरांचा लाभ होईल, असे निर्णय आणि अशी भूमिका आतापर्यंत भाजपाने घेतली आहे. आता तर पर्यावरणाशी दाट संबंध असलेल्या जंगलांचा सफाया करण्याचे धोरण भाजपाने अवलंबले आहे. रेशनिंगपासून सर्वसामान्यांना परवडणा-या घरांपर्यंत सगळय़ाच बाजूंनी फडणवीस यांच्या सरकारने सर्वसामान्यांची कोंडी केली आहे. किमान संरक्षित क्षेत्राला तरी सोडा, अशी म्हणण्याची वेळ आता सर्वसामान्यांवर आली आहे.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on