आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडून (एआयबीए) दडपणात आलेल्या ‘बॉक्सिंग इंडिया’ने अखेर महिला बॉक्सर सरिता देवीचा पती आणि प्रशिक्षक थोयबा सिंग यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडून (एआयबीए) दडपणात आलेल्या ‘बॉक्सिंग इंडिया’ने अखेर महिला बॉक्सर सरिता देवीचा पती आणि प्रशिक्षक थोयबा सिंग यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
‘‘एशियाडमध्ये कांस्यपदक स्वीकारण्यास दिलेला नकार हे सरिताचे कृत्य भावनेच्या भरातील होते, हे आम्ही एआयबीएला समजावले आहे. त्याच वेळी सरिताचे वैयक्तिक प्रशिक्षक आणि पती यांच्यावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावू, असेदेखील आम्ही एआयबीएला कळवले होते. कारण त्यांची बॉक्सिंग रिंगच्याबाजूला असलेली उपस्थिती अवैध होती. बॉक्सिंग रिंगच्या बाजूला उपस्थित राहण्यासाठी गरजेचे ‘अॅक्रिडिएशन’ त्यांच्याकडे नव्हते.
परिणामी, त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येणार आहे.
मात्र त्याच वेळी सरितावर आजीवन बंदीसारखी कारवाई होऊ नये, यासाठीदेखील आम्ही एआयबीएची मनधरणी करत आहोत,’’ असे बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोदिया यांनी स्पष्ट केले. सध्या सरितावर एआयबीएने तात्पुरते निलंबन घालण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघा