|
विशुद्ध प्रेमाचा अनुभव
मेष – तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटेल. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धावपळीमुळे तुम्ही थकून जाल. तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे; परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. विशुद्ध प्रेमाचा तुम्हाला अनुभव मिळणार आहे. त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा. तुमचा चमू एकत्र आणून सार्वत्रिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुमची स्थिती आता अतिशय सशक्त आहे. व्यक्तिमत्त्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुम्ही प्रवास कराल.
लकी क्रमांक : ४
|
|
छान व्यक्तीशी ओळख होईल
वृषभ – स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत सप्ताह. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुम्ही नेहमी ज्या व्यक्तीवर भरवसा केला, ती व्यक्ती तुमच्याशी प्रामाणिक नाही हे समजल्यावर तुम्ही प्रचंड अस्वस्थ व्हाल. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही व तुमचा जोडीदार दुस-या बाजूला, एकमेकांत गुंफलेले. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची एका छान व्यक्तीशी ओळख होईल. प्रवास करणार असाल, तर तुमच्या सामानांची विशेष काळजी घ्यावी. तुमचा/तुमची जोडीदार तुमची जास्त काळजी घेईल.
लकी क्रमांक : ३
|
|
प्रेम वेगळी उंची गाठेल
मिथुन – तुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका, त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील; त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. यश आणि आनंद मिळण्यासाठी हा चांगला काळ आहे, म्हणून आपल्या निरंतर प्रयत्नांना आणि आपणास पाठिंबा देणा-या कुटुंबीयांचे आभार माना. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने सप्ताह सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. प्रवासामुळे नवीन व्यवसायाच्या संधी मिळतील. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. लकी क्रमांक : १
|
|
प्रिय व्यक्तीला आनंदी करणे कठीण
कर्क – आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला हॉस्पिटल गाठावे लागू शकते. मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. एका मित्र/मैत्रिणीच्या समस्येमुळे तुम्हाला वाईट वाटेल आणि त्यांची चिंता वाटेल. तुमच्या प्रिय व्यक्तीला आनंदी करणे कठीण पडेल. महागडय़ा प्रकल्पावर सही करताना तुमचा सूज्ञपणा वापरा. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. तुमच्या जोडीदाराशी झालेल्या वादामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यातील बंध सैल झाले आहेत, असे तुम्हाला वाटू शकेल.
लकी क्रमांक : ५
|
|
लाभदायक सप्ताह
सिंह – तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल. केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक सप्ताह. जर तुम्ही प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल मनाला रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला सप्ताह. पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणा-या लोकांसोबत जाण्यास विरोध करा.
लकी क्रमांक : ४
|
|
कुटुंब उत्साही राहील
कन्या – तुमचा भावनाविवश स्वभाव तुम्हाला एखाद्या गंभीर आजारपण जडवू शकतो. तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करा. दूरवरच्या नातेवाइकांकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही होईल. तुमचे अनियंत्रित चंचल वागणे यामुळे प्रिय व्यक्तीसोबत तुमचे मतभेद होतील. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल, तोपर्यंत कोणताही वायदा करू नका. प्रवासाच्या काही योजना असतील, तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. संयम आणि शांतता राखली तर प्रत्येक अडथळा पार करता येऊ शकेल.
लकी क्रमांक : २
|
|
प्रतिष्ठेला बाधा
तूळ – तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्त्व बदलण्याचा प्रयत्न करा. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. तुम्ही घरात आणि घराच्या अवतीभवती काही मोठे बदल करून घेण्याची शक्यता आहे. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाधा आणू शकतात. रोजच्यापेक्षा तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा भरपूर वेळ खर्च होईल. वैवाहिक आयुष्याचे काही साइड इफेक्ट्ससुद्धा असतात. त्यापैकी काही तुम्हाला दिसतील.
लकी क्रमांक : ५
|
|
कार्यशील सप्ताह
वृश्चिक – निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल. कारण, त्यामुळे तुमच्या संधी, तर कमी होतातच, पण तुमच्या शरीराचा समतोल बिघडू शकतो. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला तुमच्या मित्रांची सर्वाधिक गरज असेल तेव्हा ते तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा सप्ताह आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्यके शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल, तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. लकी क्रमांक : ६
|
|
नम्रपणे वागा
धनु- मतभिन्नता आणि दडपण यामुळे तुम्ही चिडचिडे आणि बैचेन व्हाल. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. जीवनसाथीच्या आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुस-यांच्या दडपणाखाली वावरू नका. आपल्या वाटेत येणा-या सर्वाशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षकपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादूई आकर्षणाचे गुपित माहीत होईल. नातेसंबंध जपा.
लकी क्रमांक : ३
|
|
अतिखर्च होईल
मकर- उच्च व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवलदेखील आहे. चैनीच्या वस्तू आणि करमणुकीसाठी अतिखर्च करू नका. मित्र आणि जवळचे स्नेही मदतीचा हात पुढे करतील. तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. वेळेला पैशाइतपतच असणारे महत्त्व तुम्ही जाणत असाल, तर तुमच्या क्षमतेची उच्चतम पातळी गाठण्यासाठी आवश्यक ती पावले उचला. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. तुम्ही असं काहीतरी करणार आहात, ज्यानं तुमचा/तुमची जोडीदार खूप एक्साइट होणार आहे.
लकी क्रमांक : ३
|
|
भांडकुदळ स्वभावावर नियंत्रण ठेवा
कुंभ- आपल्या भांडकुदळ स्वभावावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आपल्या नातेसंबंधाना धक्का बसू शकतो. खुल्या मनाने विचार करणे आणि कोणाही बद्दलचे पूर्वग्रह सोडून देण्याने आपल्या या स्वभावावर मात करू शकता. दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या गोष्टी बोलू नका. तुम्ही प्रेम करीत असलेल्या व्यक्ती दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्या. आपल्या प्रिय व्यक्तीमध्ये दोष शोधण्यात वेळ वाया घालवू नका. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी विचित्र प्रकारे वागण्याची शक्यता आहे. तुमचा संयम सोडू नका.
लकी क्रमांक : १
|
|
मोह तीव्र वेदना देईल
मीन – तुमच्या चेह-यावरील निरंतर स्मित, नवख्या माणसामध्ये आपलेपणा निर्माण करेल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे, अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही. इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणा-या समस्या सोडवू शकाल. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुम्हाला तीव्र दु:ख देईल. सप्ताह कठीण असणार आहे. पण, संयम आणि शांतता राखली तर प्रत्येक अडथळा पार करता येऊ शकेल. तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यांवर परिणाम होऊ शकेल.
लकी क्रमांक : ८
|