सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बँकेच्या नफ्यात जानेवारी ते मार्च या तिमाहीत ३१ टक्क्यांची घट झाली. या तिमाहीत ४०९ कोटींचा नफा झाला.
नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बँकेच्या नफ्यात जानेवारी ते मार्च या तिमाहीत ३१ टक्क्यांची घट झाली. या तिमाहीत ४०९ कोटींचा नफा झाला.
तर गेल्या वर्षी याच तिमाहीत ५९२.३४ कोटींचा नफा मिळाला होता. नफा घटला असला तरी महसुलात मात्र वाढ झाली असून ५,३५७.४० कोटींचा महसूल मिळाला असल्याचे बँकेने म्हटले आहे.
२०१३-१४ या वर्षात बँकेला १,७११.४६ कोटींचा नफा मिळाला. यात २०१२-१३ च्या तुलनेत १४.६ टक्क्यांची घट झाली. तर १९,९४५.२१ कोटींचा महसूल मिळाला. चौथ्या तिमाहीत बुडित कर्जाचे प्रमाण २.६२ टक्क्यांपर्यंत वाढले. संचालक मंडळाने प्रति शेअर ३० टक्के लाभांश देण्याची घोषणा केली.