‘सिगारेट पिणे हे शरीराला हानिकारक आहे’ ही सूचना सिगारेटच्या प्रत्येक पाकिटावर छापली जाते. भविष्यात ही सूचना अधिक मोठय़ा आकारात छापावी लागणार आहे.
नवी दिल्ली – ‘सिगारेट पिणे हे शरीराला हानिकारक आहे’ ही सूचना सिगारेटच्या प्रत्येक पाकिटावर छापली जाते. भविष्यात ही सूचना अधिक मोठय़ा आकारात छापावी लागणार आहे. सिगारेटच्या पाकिटाचा जवळपास ८५ टक्के भागावर ही सूचना लावण्याची ताकीद केंद्र सरकारने दिली आहे.
सिगारेटच्या पाकिटावर भविष्यात ६० टक्के भागावर चित्र आणि उर्वरित २५ टक्के भागांवर सूचना असावी, अशी अधिसूचना केंद्रीय आरोग्य खात्याने काढली आहे. सध्या सिगारेटच्या पाकिटावर ४० टक्के भागावर धोक्याचे चित्र लावता येणे सक्तीचे आहे.
सर्व सिगारेट कंपन्यांना सिगारेट पाकिटावरील ८५ टक्के भागात धोक्याचे चित्र प्रसिद्ध करावे लागणार आहे. यामुळे नागरिकांना सिगारेटच्या धोक्याची जाणीव होऊ शकेल, असे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.
तंबाखू म्हणजे मृत्यू आहे. कान, नाक व घसा तज्ज्ञ म्हणून याचे दुष्पपरिणाम आपण स्वत: पाहिले आहेत. ८५ टक्के भागात सिगारेटच्या धोक्याबाबत माहिती देणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.