राष्ट्रीयीकृत बँक असलेली सेंट्रल बँक ऑफ इंडिया येत्या सहा महिन्यांमध्ये देशभरात २०० शाखा आणि १६०० एटीएम नव्याने सुरू करणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष एम. व्ही. टांकसाळे यांनी दिली.
मुंबई – राष्ट्रीयीकृत बँक असलेली सेंट्रल बँक ऑफ इंडिया येत्या सहा महिन्यांमध्ये देशभरात २०० शाखा आणि १६०० एटीएम नव्याने सुरू करणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष एम. व्ही. टांकसाळे यांनी दिली. तसेच चालू आर्थिक वर्षात बँकेच्या उलाढालीत सुमारे १७ टक्के वाढ अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
सेंट्रल बँक ई-लॉबी सेवाही सुरू करणार असून, याअंतर्गत एकाच ठिकाणी चेक जमा करणे, रोख रक्कम भरणे किंवा काढणे व पासबुकमध्ये नोंदी करणे आदी सुविधा देण्यात येणार आहेत. सध्या मुंबई आणि बेलापूर येथे ई-लॉबी सेवा सुरू असल्याचे टांकसाळे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा या भागांतील दुर्गम भागात बँकिंग प्रतिनिधींमार्फत सेवा देण्यासाठी बँकेने पुढाकार घेतल्याचेही त्यांनी सांगितले.