मुंबई शेअर बाजारात गुरुवारी सेन्सेक्स २५,३४२ अंशांवर बंद झाला.
मुंबई- मुंबई शेअर बाजारात गुरुवारी कमालीचा चढउतार पाहायला मिळाला. बीएसई निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स २५६ अंशांनी कोसळून पुन्हा ३ अंशांनी चढला. २५,३४२ अंशांवर सेन्सेक्स बंद झाला तर निफ्टी राष्ट्रीय निर्देशांक ७७३८ वर बंद झाला.
२०१५-१६ आर्थिक वर्षाच्या अखेरच्या आजच्या दिवशी सेन्सेक्सने आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी नोंदवत ९.३६ टक्क्यांची घसरण दर्शवली.
गुंतवणूकदारांचे ७ लाख कोटी रुपये बुडाले. जागतिक वारे आणि परदेशी निधीचा बाहेर गेलेला ओघ यामुळे देशांतर्गत समभागांची दाणादाण केली.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही ०.६८ टक्के आणि ०.४६ टक्के इतके वाढले. संपलेल्या आर्थिक वर्षात निफ्टी ९.७२ टक्क्यांनी घसरला.