नवनवे शिखर सर करणा-या मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सोमवारी आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली.
मुंबई – नवनवे शिखर सर करणा-या मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सोमवारी आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्सने २८ हजार २७.९६ या विक्रमी स्तराला स्पर्श केला तर निफ्टीतही कमालीची वाढ होत तो आठ हजार ३८३.०५ या उच्चांकी स्तरावर पोहोचला.
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये १५९.३३ अंकांची वाढ होत तो २८ हजार २७.९६ या विक्रमी स्तरावर पोहोचला तर निफ्टीत ४६.०५ अंकाची वाढ होत तो सर्वाधिक आठ हजार ३८३.०५ या स्तरावर पोहोचला.
याआधी पाच नोव्हेंबर रोजी सेन्सेक्सने प्रथमच २८ हजार १०.३९ या जादुई आकड्याला स्पर्श केला होता तर निफ्टीही नवे शिखर सर करत १४.१५ अंकांच्या वाढीसह ८,३३८.३०वर बंद झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा झालेला विस्तार आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून वाढत चाललेली गुंतवणूक या दोन्हींचा फायदा सेन्सेक्स आणि निफ्टीला ऐतिहासिक स्तरावर पोहोचण्यास कारणीभूत ठरल्याचे दलालांनी सांगितले.