सेल्फी स्पेशल स्मार्टफोनसाठी ग्राहकांची अधिक मागणी लक्षात घेता पॅनासोनिकने नवा इलुगा स्विच हा स्मार्टफोन आणला आहे.
नवी दिल्ली – इतरांनी आपले फोटो काढण्यापेक्षा सेल्फीद्वारे आपले आपणच फोटो काढण्याची जणू फॅशनच झालीये.
हल्ली इतर फीचर्ससोबत स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे, त्यातून आपला सेल्फी चांगला येईल ना?, याबाबत ग्राहक अधिक जागरुक झाला आहे. त्यामुळे सेल्फी स्पेशल स्मार्टफोनसाठी ग्राहकांची अधिक मागणी लक्षात घेता पॅनासोनिकने नवा इलुगा स्विच हा स्मार्टफोन आणला आहे.
या फोनचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा फ्रंट कॅमेरा आठ मेगापिक्सेलचा आहे. अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवर हा विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. या किंमतही कंपनीने १९ हजार ९९० इतकी ठेवली आहे.
पॅनासोनिक इलुगा स्विचची वैशिष्ट्ये
» ५.५ इंच डिस्प्ले
» ३२ जीबी इंटरनल मेमरी
» १.५ गिगाहर्टझ ओक्टा कोर क्वालमन स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
» दोन जीबी रॅम
» १३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा
» आठ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
» ५.० अँड्रॉईड लॉलीपॉप
» किंमत – १९ हजार ९९० रुपये