उत्तर काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरु असून, मागच्या सात दिवसात येथे चौथी हत्या झाली आहे.
श्रीनगर – उत्तर काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरु असून, मागच्या सात दिवसात येथे चौथी हत्या झाली आहे. सोपोरमधल्या मुंडजी भागामध्ये एका अज्ञात दहशतवाद्याने अय्याझ अहमद रेशीची त्याच्या घराबाहेर गोळया झाडून हत्या केली.
अय्याझ अहमद रेशीने दहशतवादाचा मार्ग सोडला होता. कुठल्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेली नाही. मागच्या सात दिवसातील ही चौथी तर, सोपोर भागातील दुसरी हत्या आहे.
हिजबुल मुजाहिद्दीनच्या संशयित दहशतवाद्याने रविवारी सोपोरमध्ये एका दुकानदाराची गोळया झाडून हत्या केली होती. मेहराज उद्दीन भट या पोल्ट्री दुकानदाराची रविवारी बदामीबाग भागामध्ये दहशतवाद्याने त्याच्या दुकानाबाहेर गोळया झाडून हत्या केली होती.