सुंदर दिसण्यासाठी फक्त चेहराच सुंदर असून चालत नाही, तर सर्वागीण सौंदर्य मिळवण्यासाठी नितळ, तेजस्वी चेह-यासोबत सुडौल, नितळ मान, गळा हे सौंदर्य वाढविण्याचे पूरक काम करतात. सकाळी व रात्री मानेची पुढीलप्रमाणे निगा राखावी.
>> क्लिन्झिंग मिल्कने कापसाने मान स्वच्छ साफ करावी. यासाठी साधे दूधही वापरता येईल. यामुळे मेकअप, क्रीम आदींने साफ होईल.
>> चंदन पावडर व मुलतानी माती दह्यात भिजवून मानेला चोळून दहा मिनिटे धुवावे.
>> लिंबूरस, दूध पावडर, गुलाबपाणी एकत्र करून मानेला लावावे. वीस मिनिटांनी धुवावे. रेशमी कापडाने मान/गळा हलकेच घासावे. त्वचा स्वच्छ, तेजस्वी होते.
>> बदाम तेल, कोल्डक्रीम व गुलाबपाणी समप्रमाणात एकत्र करून एक मसाज क्रीम करावे. ती मसाज क्रीम बोटांना लावून हळूवारपणे मसाज करावा.
>>ओट्सचे जाडसर पीठ, लिंबूरस व दही एकत्र करून मानेला मसाज करावा. तो मसाज केलेला थर अर्धा तास ठेवून काढावा. नंतर मॉइश्चरायझर लावावे. दही व ओट्समुळे मृतपेशी निघून लिंबामुळे थोडा ब्लिचिंगसारखा फायदा मिळतो.