दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी त्यांच्या कौसांभी निवासस्थानाबाहेर जनता दरबार घेतला.
नवी दिल्ली – दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी त्यांच्या कौसांभी निवासस्थानाबाहेर जनता दरबार घेतला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, हा माझा नाही तुमचा विजय आहे. तुमच्यापैकी बहुतांश जण इथे माझे अभिनंदन करण्यासाठी आले आहेत. तरीही मी म्हणेन की, हा माझा नाही तुमचा विजय आहे.
केजरीवालांच्या जनता दरबारात बहुतांश नागरिक विजेच्या आणि पाण्याच्या तक्रारी घेऊन आले होते. या गर्दीमध्ये वकिल, अभियंते आणि विद्यार्थी होते. काही जणांनी त्यांना दिल्ली पोलिसांची सुरक्षा घेण्याची विनंती केली.
आपने त्यांचे खटले फुकट लढवण्यासाठी वकिलांची एक टीम उभारावी असा सल्लाही काहीजणांनी दिला. केजरीवालांनी शनिवारी रामलीला मैदानावर होणा-या शपथविधी सोहळयाला उपस्थित रहाण्याचे सर्वांना निमंत्रण दिले. अरविंद केजरीवाल यांनी बुधवारीही त्यांच्या निवासस्थानाबाहेर जनता दरबार घेतला होता.