डॉलरच्या तुलनेत रुपयाने बुधवारी दोन आठवड्यातील ५९.१० च्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला.
मुंबई – रुपयाचे अवमूलन रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या उपाययोजनांचा परिणाम आता दिसू लागला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने बुधवारी दोन आठवड्यातील ५९.१० च्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला.
सरकारने बारा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूकीला परवानगी दिल्याचा परिणाम बुधवारी रुपयावर दिसून आला. त्यात विशेषत: दूरसंचार क्षेत्रात १०० टक्के परकीय गुंतवणूकीला प्राधान्य देण्यात आले.
दरम्यान मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ५९.३१ वर बंद झाला होता. त्यात केवळ ५८ पैशांची वाढ झाली होती. दरम्यान, शेअर बाजारातही रुपयाचे मूल्य वाढल्यामुळे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने दिवसभरात ११८.७९ अंशांची कमाई केली.