नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन या त्याग आणि सहनशीलतेच्या प्रतीक आहेत त्यांना भारतरत्न पुरस्कारने सन्मानित केले पाहिजे असे वादग्रस्त विधान आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केले आहे.
गुवहाटी – नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन या त्याग आणि सहनशीलतेच्या प्रतीक आहेत त्यांना भारतरत्न पुरस्कारने सन्मानित केले पाहिजे असे वादग्रस्त विधान आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केले आहे.
तरुण गोगोई यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर वयैक्ती स्वरुपाची टीका केली आहे. पुढच्या दहा दिवसात मी जशोदाबेन यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस करणार आहे.
त्या महान भारतीय महिलेचे प्रतिक आहेत. त्या त्याग आणि सहनशीलतेच्या भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील प्रतीक आहेत. शांत राहून त्यांनी जे दु:ख सहन केले त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार दिला पाहिजे. भारतातील कोणालाही त्यांचे दु:ख समजले नाही असे गोगोई म्हणाले.
जशोदाबेन या ख-या सन्यासी आहेत. मोदी सन्यासी असल्याचा दावा करतात पण प्रत्यक्षात त्यांना सत्तेची हाव आहे. ते अमेरिकन सन्यासी आहेत. त्यांना फक्त मुख्यमंत्रीपद माहित आहे अशी वयैक्तीक टीका गोगोई यांनी केली.
वडोद-यातून उमेदवारी अर्ज दाखल करताना मोदी यांनी प्रथमच उमेदवारी अर्जावरील पत्नीच्या रकान्यात जशोदाबेन यांचे नाव लिहीले. तेव्हापासून हा वाद सुरु झाला आहे. यापूर्वी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामध्ये मोदी यांनी पत्नीच्या नावाचा रकाना रिकामा सोडला होता. मोदी यांनी यापूर्वी पत्नीची ओळख का जाहीर केली नाही ? असा विरोधकांचा सवाल आहे.