तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललित यांच्या जामिनाची मुदत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांनी वाढवली.
नवी दिल्ली – बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात दोषी ठरलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललित यांच्या जामीनाची मुदत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांनी वाढवली.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाला विशेष खंडपीठ स्थापन करुन, या प्रकरणाची नियमित सुनावणी घेऊन तीन महिन्यांच्या आत सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशानुसार जयललिता यांनी अपीलासंबंधीची सर्व कागदपत्रे कर्नाटक उच्च न्यायालयाला सुपूर्द केल्याची माहिती जयललिता यांचे वकिल के.टी.एस तुलसी यांनी न्यायमूर्ती एच.एल.दत्तू यांना दिली.
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात जयललिता यांना विशेष न्यायालयाने चार वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.या शिक्षेविरोधात जयललिता यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.