पालघर जिल्ह्यात जव्हार तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागातील शासकीय आश्रमशाळा व जिल्हा परिषद शाळा तसेच शैक्षणिक संस्था तालुक्यातील शिक्षण घेणारे १ हजार २११ आदिवासी विद्यार्थी अपंगावर मात करीत, गिरवताहेत शिक्षणाचे धडे.
जव्हार- जव्हार तालुक्यात १ लाख ६० हजार लोकसंख्या असून, शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या असलेला तालुका आहे. जव्हार आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत शासकीय आश्रमशाळा चालविल्या जात आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत २४५ जिल्हा परिषद शाळा आहेत. तसेच पाच ठिकाणी शैक्षणिक संस्था असून, जव्हार शहरात भारतीय विद्यापीठ व गोखले एज्युकेशन सोसायटीची शाळा व कॉलेज आहेत.
जव्हार तालुक्यातील शिक्षण घेणा-या १ हजार २११ दिव्यांग व अपंग विद्यार्थाना जव्हार पंचायत समितीकडून शैक्षणिक साहित्य पुरविले जात आहे. या अपंग विद्यार्थाना सहकार्य करणारे साहाय्यक शिक्षक मिलिंद कांबळे हे तळागाळातील आदिवासी अपंग विद्यार्थाना सर्वतोपरी मदत करणारे शिक्षक ठरले आहेत. या विद्यार्थाना तीन चाकी सायकल, लार्ज प्रिंट पुस्तके, श्रवणयंत्र असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे.