अॅमेझॉन या संकेतस्थळाने आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा इंदि ग्रेट इंडियन फेस्टिव्हल हा सेल जाहीर केला आहे. आकर्षक किंमतीत हजारो ब्लॉकबस्टर व्यवहार करण्यासाठी सज्ज व्हा.
बंगळुरू – अॅमेझॉन या संकेतस्थळाने आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा दि ग्रेट इंडियन फेस्टिव्हल हा सेल जाहीर केला आहे. आकर्षक किंमतीत हजारो ब्लॉकबस्टर व्यवहार करण्यासाठी सज्ज व्हा. आजवरच्या इतिहासात प्रथमच, हा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल केवळ अॅमेझॉन प्राईम सदस्यांसाठी १२ तास आधीच, म्हणजेच २० सप्टेंबरला दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. हजारो आकर्षक डील्ससह सदस्यांना प्रथम या फेस्टिव्हलाचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे.
या बारा तासांमध्ये, अॅमेझॉन प्राईम सदस्यांचा खरेदीचा अनुभव अधिक रंजक व्हावा, यासाठी एचडीएफसी कार्ड कॅशबॅक आणि अॅमेझॉन पे ऑफर्स लागू करण्यात येणार आहेत. संपूर्ण चार दिवसीय फेस्टिव्हलमध्ये, प्राईम सदस्यांना बडय़ा ब्रॅण्ड्सवर आकर्षक डील्सचा लाभ घेता येणार असून प्राईम सदस्य नसलेल्या ग्राहकांच्या ३०मिनिटे आधीच महत्त्वाच्या डील्सचा लाभ या सदस्यांना देण्यात येणार आहे. ‘‘आमचे ग्राहक फेस्टीव्ह सिझनची तयारी करीत असतानाच, भारतातल्या मोठमोठय़ा ब्रॅण्ड्सच्या आकर्षक डील्स ग्राहकांसाठी घेऊन येण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.
‘करो मिल के तय्यारी, तोही त्योहार त्योहार लगता है’ या आमच्या यंदाच्या टॅगलाईनशी प्रामाणिक राहून ग्राहकांचा फेस्टीव्ह खरेदीचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी आम्ही विकेते, भागीदार आणि विविध ब्रॅण्ड्स यांना एकत्र आणून सेवा पुरवित आहोत,’’ अॅमेझॉन इंडियाच्या कॅटेगरी व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्ष मनीष यांनी स्पष्ट केले.
[EPSB]
पॅकेजिंग मशीनरी क्षेत्रातील कंपन्यांचा गौरव
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकेजिंग या पॅकेजिंग क्षेत्राचा प्रसार आणि स्तर ठरवणा-या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पॅकमशीन अॅवॉर्डस २०१७ च्या विजेत्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली.
[/EPSB]