स्मार्टफोन विश्वात अग्रेसर असलेल्या सॅमसंग कंपनीने आणखी एक नवीन स्मार्टफोन बारतीय बाजारात दाखल केला आहे.
नवी दिल्ली- स्मार्टफोन विश्वात अग्रेसर असलेल्या सॅमसंग कंपनीने आणखी एक नवीन स्मार्टफोन बारतीय बाजारात दाखल केला आहे. ‘सॅमसंग गॅलेक्सी ए ९ प्रो’ हा स्मार्टफोन येत्या २६ सप्टेंबरपासून भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
‘सॅमसंग गॅलेक्सी ए ९ प्रो’ हा स्मार्टफोन काळा, पांढरा आणि गोल्ड रंगांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनची किंमत ३२ हजार ४९० रुपये आहे. ‘सॅमसंग गॅलेक्सी ए ९ प्रो’ या स्मार्टफोनचे खास वैशिष्टय म्हणजे बॅटरी ५००० एमएएच देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन मार्च महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आला.
‘सॅमसंग गॅलेक्सी ए ९ प्रो’ स्मार्टफोनचे फिचर्स
» सहा इंच डिस्प्ले
» १.८ ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
» अॅन्ड्रोईड ६.० मार्शमॅलो
» चार जीबी रॅम
» ३२ जीबी इंटरनल मेमरी
» १०८०X१९२० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन
» १६ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा
» आठ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
» ५००० एमएएच बॅटरी
» किंमत – ३२ हजार ४९० रुपये