उत्तरप्रदेशमध्ये भाजपा खासदाराने उलटा तिरंगा फडकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
उत्तरप्रदेश- देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असून ठिकठिकाणी नेते मंडळीच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र उत्तरप्रदेशमध्ये भाजपा खासदाराने उलटा तिरंगा फडकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उलटा तिरंगा फडकवतानाचे त्यांचे फोटो टीकेचा विषय झाले आहेत.
उत्तरप्रदेशमधील सीतापूरयेथील महोली भागात हा प्रकार उघडकीस आला असून ट्विटरवर हा फोटो व्हायरल होत आहे. धौरहराच्या भाजपा खासदार रेखा वर्मा यांनी हातात तिरंगा घेतला असून तो तिरंगा उलटा असल्याचेही त्यांच्या लक्षात आले नाही.
ट्विटरवर सध्या ‘नरेंद्र मोदी हे आहे आपले सरकार’ असे ट्विट करत हा फोटो व्हायरल होत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच भाजपा खासदार वर्मा यांना उलटा तिरंगा पकडून तिरंग्याचा अपमान केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार की नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
@narendramodi ye h aapje govt k M. P.(DHAURAHARA UP) Rekha verma ji… Indian flag ka apman krne me inhe jra bhi hichak nhi hui…shameful. pic.twitter.com/ilNVQXcHEP
— Abhishek Kr Mishra (@Abhishe80385696)