१४ वर्षाखालील मुलांना काम करण्यास बंदी घालणारे विधेयक राज्यसभेत मंगळवारी मंजूर झाले.
नवी दिल्ली- १४ वर्षाखालील मुलांना काम करण्यास बंदी घालणारे विधेयक राज्यसभेत मंगळवारी मंजूर झाले. या कायद्याचे उल्लंघन झाल्यास दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
मात्र, आपल्या कौटुंबिक व्यवसायात काम करणा-या मुलांना या कायद्यातून सूट देण्यात आली.
बालकामगार सुधारणा विधेयकानुसार १४ वर्षाखालील मुलांना काम देणे हा दखलपात्र गुन्हा ठरणार आहे. याबद्दल मालकाला व संबंधित मुलाच्या आई-वडिलांना शिक्षा होऊ शकते.