दहशतवाद्यांनी सुट्टीवर आलेल्या बीएसएफ जवानाची दहशतवाद्याने घरात घुसून हत्या केली. या हल्ल्यात त्या जवानाचे कुटुंबीय जखमी झाले.
श्रीनगर- दहशतवाद्यांनी सुट्टीवर आलेल्या बीएसएफ जवानाची दहशतवाद्याने घरात घुसून हत्या केली. या हल्ल्यात त्या जवानाचे कुटुंबीय जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री उत्तर काश्मीरमधील बांदिपोरा जिल्ह्यात घडली.
रमीझ अहमद पारे असे शहिद जवानाचे नाव आहे. रमीझ हे राजस्थानच्या सीमेवर कार्यरत होते. सध्या ते सुट्टीवर आले होते.
रमीझ यांचे घर हाजीनमधील पारे मोहल्ल्यात आहे. दहशतवाद्यांनी नियोजनद्धपणे रमीझ यांच्यावर हल्ला केला. दहशतवादी त्यांच्या घरात घुसले आणि सर्व कुटुंबावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात रमीझ यांचा जागीच मृत्यू झाला तर रमीझ यांचे वडील, भाऊ आणि चुलती गंभीररित्या जखमी झाले आहेत.
यापूर्वी दहशतवाद्यांनी १० मे रोजी शोपिया परिसरात लेफ्टनंट उमर फैयाज यांचीही अशाच पद्धतीने हत्या केली होती. उमर फैयाज हे एका लग्नसोहळ्याला गेले होते, त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण करुन हत्या केली होती.