कलारास कॉलेज ऑफ कॉमर्स आणि चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर शाळेतर्फे एक भव्य कार्यकमाचे आयोजन चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर हायस्कूल, यारी रोड, अंधेरी येथे करण्यात आले होतं.
यासाठी कॉमनवेल्थ गेम २०१४ आणि वर्ल्ड आर्टिस्टिंक जिमनॅस्टिक चॅम्पिनशिप जिमनॅस्टमध्ये ब्राँज मेडल जिंकणारी जगप्रसिद्ध दीपा कर्माकर मुख्य अतिथी म्हणून आली होती.
शिवाय द्रोणाचार्य पुरस्कार विजेता बिश्वेश्वर नंदी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी प्राचार्य अजय कौल आणि शाळेचे एक्टिव्हीटी अध्यक्ष प्रशांत काशिद आणि शाळेचे व कॉलेजचा संपूर्ण स्टाफ तसेच सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. सर्व मान्यवरांना फुलांचे गुच्छ व ट्राफी देऊन सन्मानित करण्यात आले.
चिल्ड्रन वेल्फेअर सेंटरचे प्राचार्य अजय कौल म्हणाले,‘आम्ही लवकरच मुलांसाठी जिमनॅस्टिक सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यामुळे आमच्या शाळेतील आणि कालेजमधील मुले विविध स्पर्धामध्ये पुढे येतील.’
जगप्रसिद्ध जिमनॅस्ट दीपा कर्माकर म्हणाल्या, ‘सर्व मुलांनी अभ्यासाबरोबर खेळामध्येही लक्ष देणे गरजेचे आहे. दोन्ही गोष्टी जीवनात महत्त्वाच्या आहेत. आपली इच्छा आणि गरजेच्या दृष्टीने यांना प्रथम स्थान दिले पाहिजे. शाळेचे एक्टिव्हीटी अध्यक्ष प्रशांत काशिद म्हणाले, ‘खेळामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांने आवड दाखवायला हवी.’
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बिश्वेश्वर नंदी म्हणाले, ‘नुकत्याच झालेल्या रियो ऑलिंम्पिक २०१६ मध्ये आर्टिस्टिंक जिमनॅस्टमध्ये ५२ वर्षानंतर प्रथमच भारताकडून दीपाने या स्पध्रेत भाग घेतला आणि ती चौथ्या स्थानावर आली. दीपा कर्माकरला आज संपूर्ण देश ओळखतो तो याचमुळे.
त्रिपुरा ही एक छोटी जागा असून आज दीपा कर्माकरमुळे संपूर्ण भारत देश त्याला ओळखू लागला आहे.’ यावेळी कलारास कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. जाहिदा शेख, कलारास कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्य डॉ. सफिया मुकदमा, चिल्ड्रन वेल्फेअर सेंटरच्या शिक्षिका डायना रेयेन, जिलोत्तामा बेलेल, हुमेरा नागरी, अक्षा मेमन, चनी खेडवाल इत्यादीदेखील या कार्यक्रमात भाग घेतला आणि हा कार्यक्रम सफल करण्यासाठी आपला संपूर्ण सहयोग दिला.